Tuesday, July 21, 2020

तन्दुरी चिकन

***तन्दुरी चिकन***

 

साहीत्य::==१ कि चिकन,१ कापलेला कांदा, २ लिंबाचे तुकडे,१ जुडी कोथिंबीर,२ चमचे लसून पेस्ट,२ चमचे आले पेस्ट,पावशेर दही,मीठ चवीनुसार,२ चमचे मिरची पावडर,१ चमचा गरम मसाला,थोडी कसुरी मेथी,१चमचा चाट मसाला,१ चमचा वाटलेली काळी मिरी,थोडा खाण्याचा लाल रंग.

कृती::==*आल लसून पेस्ट बनवून,त्यामध्ये दही मीठ मिरची पावडर,गरम मसाला,कसुरी मेथी,चाट मसाला,काळी मिरी पावडर,लाल रंग घेऊन चांगले एकत्र करावे.

*चिकन घेऊन त्यामध्ये वरील मसाले घालावे.चांगले वर खाली करून रगडावे.

*१/२ तास चिकन मॅरीनेट करण्यासाठी फ्रीझर मध्ये ठेवावे.

*नंतर तंदूर मध्ये बेक करावे किंवा ओवन २२० डिग्री सेल्सी. ४२५ सेल्सी.गॅस मार्कवर ७ वर सेट करावे.तारांच्या टे् वर ठेवून १० मी बेक करा.नंतर पलटे करा पुन्हा बेक करा.

*आवडीनुसार लिंबू कोथिंबीर टाकून गरम गरम खा.


10 comments:

आलू पराठा

                                                आलू पराठा   साहित्य:===२ वाट्या गव्हाचे पीठ,२ टेब. तेलाचे मोहन,३ मोठे उकडलेले बटाटे,१ चमचा...