Wednesday, July 22, 2020

आलू पराठा

         

                                   आलू पराठा


 साहित्य:===२ वाट्या गव्हाचे पीठ,२ टेब. तेलाचे मोहन,३ मोठे उकडलेले बटाटे,१ चमचा लसून पेस्ट,५-६वाटलेल्या हिरव्या मिरच्या,१ चमचा आमचूर पावडर,मीठ चवीनुसार,पराठे भाजण्या एवढे तेल किवा आवडीनुसार तूप.

कृती:==* गव्हाच्या पिठात तेलाचे मोहन टाकून त्यामध्ये मीठ घालून घट्ट कणिक भिजवून झाकून ठेवणे.

* बटाटे सोलून किसून घ्यावेत.त्यामध्ये वाटलेली मिरची,लसून,मीठ,आमचूर पावडर,आवडीनुसार साखर घालून गोळे बनवून घेणे.

*भिजलेली कणिक घेऊन तिचे समान ८ भाग करावेत तसेच सारनाचेही तेवढे भाग करावेत.

*कणकेचा एक गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी करावी त्यामध्ये सारनाचा गोळा भरून हलक्या हाताने गोल पराठा पोळपाटवर पीठ लावून लाटून घेणे.

* जाड अथवा नॉनस्टीक तव्यावर तूप नाहीतर तेल लावून दोन्ही बाजूने खमंग परतावा  व दही किवा सॉस बरोबर सर्व्ह करा.


4 comments:

आलू पराठा

                                                आलू पराठा   साहित्य:===२ वाट्या गव्हाचे पीठ,२ टेब. तेलाचे मोहन,३ मोठे उकडलेले बटाटे,१ चमचा...